उरण ः प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण होऊन त्यामधील बहुतांशी गावे पूरग्रस्त होऊन तेथील जनतेचे अतोनात नुकसान झाल्याने या पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी उरण तालुक्यातील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था पुढे आली असून या पूरग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूचे वाटपही त्यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे बाधित झाली आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील संपूर्ण ब्राम्हणी गावामधील कुटुंबाच्या संसाराचा चिखल झाला आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उरणमधील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.
उरणमधील व्यापारी, दानशूर व्यक्ती ही मदतीसाठी पुढे सरसावले शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती भास्कर मोकल, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, उद्योगपती संजय गायकर, जी. सी. घरत, कृष्णा पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल भोईर, जसखार, खंडागळे, आईमाता हार्डवेअर, द्रोणागिरी इंटरप्रायजेस, स्वर्ण सागर ज्वेलर्स तसेच संस्थेचे सदस्य पंकज घरत, अभिमन्यू पाटील, जयेश खारपाटील, काशिनाथ खारपाटील, आनंद मढवी, दिलीप मढवी, विवेक केणी, महेश भोईर, राजा कडू, विनीत मढवी यांच्याकडून आर्थिक मिळालेल्या रकमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून आणि वस्तूरूपी मिळालेल्या मदतीचे वर्गीकरण करून त्याचे पॅकेट तयार केले गेले.
यावेळी मिरज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक कोळेकर व त्यांची टीम सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे, वन्यजीव निसर्ग संरक्षण अध्यक्ष विवेक केणी, उपाध्यक्ष आनंद मढवी, कार्याध्यक्ष काशीनाथ खारपाटील, दिलीप मढवी, महेश भोईर, मयुर मढवी, विनीत मढवी, पोलीस पाटील रफिक पाटील, सामाजिक कार्यकर्ते इम्रान पटेल, गावकरी उपस्थित होते.