पेण : प्रतिनिधी
माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, सीताराम पाटील यांच्या प्रयत्नाने पेण पूर्व विभागातील शेडाशी ग्रामपंचायत हद्दीतील मायनी, मालदेव, तलदेव, खडकीवाडी येथील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी सोमवारी (दि. 19) रात्री झालेल्या कार्यक्रमात शेडाशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील थेट सरपंच पदाचे उमेेदवार प्रकाश कदम आणि ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार भरत जाधव यांच्यासह लक्ष्मण पवार, राजेश पवार, अंकुश पवार, श्रीपत पवार, रमेश पवार, पांडुरंग पवार, देवजी पवार, अनिल पवार, रंजीत पवार, सखाराम कदम, रामू कदम, सूर्यकांत जाधव, सतीश कदम, लक्ष्मण जाधव, गणेश जाधव, सतीश जाधव, दामू भला, प्रमोद भला, नागू वाघ, रामा लेंढे, पांडुरंग जाधव, मंगेश वाघमारे, देवजी सावंत, राजेश वाळंज, श्रीकांत पवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी नागोठण्याचे कार्यकर्ते मारुती देवरे, शिवाजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.