Breaking News

गझललेखन तंत्र व मंत्र कार्यशाळा संपन्न

भाईंदर : प्रतिनिधी

विकास व संशोधन प्रतिष्ठान (ऊठऋ) आयोजित ‘कवितांजली’च्या मराठी भाषा विकास प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एस. एम. पब्लिक हायस्कूल, भाईंदर (पूर्व) येथे गझललेखन कार्यशाळा संपन्न झाली.

व्यासपीठावर उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम, संस्थेच्या विश्वस्त वसुंधरा शिवणेकर, ज्येष्ठ गझलतज्ज्ञ ए. के. शेख, गझलकार रोहिदास पोटे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण शिवणेकर आदी उपस्थित होते. डॉ. शिवणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून गझललेखन कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. सरस्वती पूजनानंतर ए. के. शेख यांनी आपल्या  सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच आमुच्या मना दे, ही प्रार्थना म्हणून कार्यशाळेची सुरुवात केली.

गझललेखन कार्यशाळेत ए. के शेख व रोहिदास पोटे यांनी गझलेचा इतिहास, गझलेचे व्याकरण तंत्र व मंत्र,  गझलेचे विविध घटक, आकृतिबंध, प्रकार, शब्दांची निवड आणि गझल सादरीकरण यावर प्रात्यक्षिकासह सोदाहरण मार्गदर्शन केले. चर्चेदरम्यान उदाहरणादाखल सुयोग्य गझला गाऊन  वातावरण गझलमय केले. त्यामुळे गझल म्हणजे काय, ती कशी असावी व कशी नसावी, गझलचे सादरीकरण कसे करावे या संकल्पना स्पष्ट झाल्या.

शेवटी गझल लिहिताना व्याकरणाचे महत्त्व, आशय कसा असावा हे सांगून गझल लिहिण्याचा मंत्रही दिला. चांगल्या आशयाच्या व सकारात्मक विचारधारा असलेल्या गझल लिहिण्यास प्रोत्साहित केले. नम्र राहून  गझल लिहिण्यापूर्वी गझलेचे शास्त्र समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आग्रहाने सांगितले. विजय म्हामुणकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply