Breaking News

वाकसमध्ये थेट सरपंचासह 10 सदस्य बिनविरोध

कर्जतमध्ये चार सरपंच आणि 40 जागांसाठी होणार निवडणूक

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद बिनविरोध झालेे असून, उर्वरित चार थेट सरपंचपदांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, वाकसमध्ये नऊ सदस्य तर उमरोली ग्रामपंचायतीमध्ये सहा आणि जामरुखमध्ये दोन सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत.

कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुख आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत आहेत. त्यासाठी दाखल झालेले नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यात थेट सरपंचपदासाठी 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे. वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने सुदर्शना संजय तांबोळी या बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर थेट

सरपंचपदासाठी नेरळमध्ये चार, उमरोलीत तीन, तर जामरुख आणि रजपे ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण 11 उमेदवारांत  निवडणूक होणार आहे.या पाच ग्रामपंचायतींमध्ये वैध ठरलेल्या 108 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे तीन ग्रामपंचायतींमधील 17 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यात वाकसमध्ये 11 पैकी 9, तर उमरोलीमध्ये 13 पैकी 6 व जामरुखमध्ये 7 पैकी 2 सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता पाच ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या उर्वरित 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात असून अपवाद वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे.

बिनविरोध

वाकस ग्रामपंचायत

थेट सरपंच- सुदर्शना संजय तांबोळी

सदस्य-

प्रभाग 1- रंजना भागीत व अशोक पेमारे

प्रभाग 2- गायत्री तांबोळी, गायत्री दुर्गे व नितीन धुळे

प्रभाग 3- सुबोध सुधाकर जगे

प्रभाग 4- अनिता दळवी, नीलम गुजरे व भरत शेळके

उमरोली ग्रामपंचायत

सदस्य-

प्रभाग 1- प्रकाश पिरकड, प्रमिला ठाणगे व अजय घारे

प्रभाग 3- ललिता बांगारा

प्रभाग 5- उत्पल जाधव व रेश्मा ठाणगे

जामरुख ग्रामपंचायत

सदस्य-

प्रभाग 1- अनिता पिंपरकर

प्रभाग 2-सविता सावंत

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply