Breaking News

लाभार्थींना उद्या मिळणार जयपूर फूट

पनवेल ः रामप्रपहर वृत्त

सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत.

पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 9 वाजता होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, डॉ. अरुणकुमार भगत, साधू वासवानी मिशनचे वैद्यकीय तज्ज्ञ  उपस्थित राहणार आहेत. शिबिरातील तपासणीनंतर हे कृत्रिम अवयव तयार झाले असून 8 सप्टेंबरला होणार्‍या कार्यक्रमात बसविण्यात येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply