Thursday , March 23 2023
Breaking News

शाळेत मद्यपार्टी करणार्या पाचजणांना शोधण्यात यश

नेरळ पोलिसांची कामगिरी; तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात तारेचे कुंपण

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

नेरळ येथील प्राथमिक उर्दू शाळेत चार दिवसांपूर्वी काही अज्ञात इसम दारू पीत बसले होते. त्यांनी दारूच्या बाटल्या शाळेच्या आवारातच टाकून दिल्या होत्या. याबाबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या घटनेतील पाच मद्यपींचा पोलिसांनी शोध लावला आहे. मात्र माफीनामा व शाळेला तारेचे कुंपण टाकून द्यावे, या अटीवर शिक्षकांनी आपली तक्रार मागे घेतली.

8 फेब्रुवारीला रात्री 11 ते 12 च्या दरम्यान नेरळ येथील  प्राथमिक उर्दू शाळेत अज्ञात इसम दारू पित बसले होते. त्यांनी दारूच्या बाटल्या शाळेच्या आवारातच टाकून दिल्या होत्या.  दुसर्‍या दिवशी शाळा उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली. याबाबत शाळेचे अध्यक्ष व शिक्षकांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, रविंद्र शेगडे, सहाय्यक फौजदार गणेश गिरी, पोलीस शिपाई शेखर मोरे, वैभव बारगजे यांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्याचे माध्यमातून आरोपीचा शोध घेतला.

नेरळ येथील सुर्वे आळीत राहणारा चिराग संजीव गुप्ता याच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम असल्याने मी व माझे मित्र किरण खाडे, तुषार शिंदे, महादेव गायकवाड, सुभाष पवार उर्दू शाळेत दारू पित बसल्याचे कबूल केले. त्या नंतर प्राथमिक उर्दू शाळेचे अध्यक्ष मुजमिल अब्बास मणियार, सदस्य रफिक आतार, सलीम तांबोळी व इतर सदस्य यांना पोलीस ठाण्यात बोलवले असता चिराग गुप्ता यांनी त्यांच्याजवळही गुन्ह्याची कबुली दिली. य ावेळी शाळेचे अध्यक्ष व सदस्यांनी गुप्ता यांनी आमची माफी मागावी व शाळेला तारेचे कंपाऊंड करून दिले तर आमची काहीही तक्रार नाही, असे सांगितले. गुप्ता यांनी ते मान्य केले. त्यामुळे सदस्यांनी व शिक्षकांनी तक्रार मागे घेतली आहे.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply