पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तक्का विभागातील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20च्या वतीने ‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत गोल्डन कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले होते.
यानिमित्त तक्का विभागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. या वेळी शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशिला घरत, नगरसेवक अजय बहिरा, मनोहर मुंबईकर, रघुनाथ बहिरा, अण्णा भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.