पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत बुधवारी (दि. 18) नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या नवीन गाड्यांच्या लोकार्पण कार्यक्रमाला महापालिका आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक संजय भोपी, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.