Breaking News

पागोट्यात हुतात्म्यांना अभिवादन

उरण : रामप्रहर वृत्त
सन 1984मध्ये उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच जण हुतात्मे झाले होते. यात पागोटे येथील तिघांचा समावेश होता. या हुतात्म्यांना 36व्या स्मृतिदिनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी शुक्रवारी (दि. 17) पागोटे येथील कार्यक्रमात अभिवादन केले. या वेळी ‘हुतात्मे अमर रहे’च्या  घोषणा देण्यात आल्या.
शेतकरी लढ्यात पागोटे येथील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील आणि कमलाकर कृष्णा तांडेल हे तीन जण हुतात्मे झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्यासह माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, सुरेश पाटील, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, जे. डी. तांडेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply