पनवेल : रामप्रहर वृत्त
महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत बापट वाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंटच्या शेजारील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या आणि गुजराती शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आला.
पनवेल येथील बापट पाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंट शेजारील रस्ता खराब झाला होता, त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत होती. महापालिकेच्या वतीने त्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे, तसेच गुजराती शाळेची दुरुस्ती देखील केली जाणार आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, अभिषेक पटवर्धन, मयुरेश नेतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.