Breaking News

कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शनपर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी संघटना विस्ताराच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला राष्ट्रीय अध्यक्ष या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे संघटनेची दोन्हीही महत्त्वाची पदे पनवेलमध्ये देण्यात आली. या वेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी मुनिरभाई तांबोळी, तर महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी रिझवना दिदी यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी कारागृहात कैद्यांना होणार्‍या असुविधा, तसेच त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा यावर मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे चेअरमन अशोक राव हे उपस्थित होते. सरकारकडून कैद्यांना वेळोवेळी भत्ता मिळतो, तसेच त्यांना हक्काच्या सुविधाही मिळतात, परंतु त्या कैद्यांपर्यंत पोहोचत नाहीत यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे आश्वासन देखील या वेळी मुनिर तांबोळी यांनी दिले.

संघटनेचा विस्तार व्हावा या दृष्टिकोनातून पनवेलमधील अनेक तरुणांनी कैदी वेल्फेअर फाउंडेशनचे सभासदत्व देखील स्वीकारले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे चेअरमन अशोक राव, सेवानिवृत्त विंग कमांडर राजेंद्र महानुभाव, समाजसेविका औड्री डिकॉस्टा, श्रेयस ठाकूर उपस्थित होते, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम शेख, फिरोज सय्यद, अफरोज सय्यद, मुजाहिद डोलारे, शब्बीर कोठारी, इम्रान शेख, सागर शेख, सिकंदर शेख, प्रिया पांडे, नीलेश राठोड आदींनी मेहनत घेतली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply