पुणे ः प्रतिनिधी
पुण्याचे डॉ. कौस्तुभ राडकर यांनी आपली 29वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा 17 तासांत पूर्ण करायची असते. हे आव्हान डॉ. कौस्तुभ राडकर यांनी 13 तास 14 मिनिटे आणि 16 सेकंदांत पूर्ण केले. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन किताब मिळाला आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत. आयर्न मॅन किताबासाठी 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे अशी स्पर्धा असते. या तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते. सध्याच्या घडीला ही स्पर्धा 40हून अधिक देशांत भरवली जाते. प्रत्येक स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतात. स्पेनच्या मलोर्का येथे झालेल्या स्पर्धेत डॉ. कौस्तुभ राडकर यांना यश आले आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.