Breaking News

दीपक पुनियालाही रौप्यपदकावर समाधान

नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था

अमित पंघलपाठोपाठ भारताचा नवोदित कुस्तीपटू दीपक पुनिया यालाही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दीपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेत दीपकने रौप्यपदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टिफन रेचमर्थ याच्याविरोधात खेळताना दीपकला दुखापत झाली होती. यासंदर्भात बोलताना ‘माझा डावा पाय प्रचंड दुखत आहे. खेळत असताना तो पाय शरीराचा भार पेलवू शकणार नाही हे मला जाणवले. अशा परिस्थितीत मी खेळू शकणार नव्हतो. माझ्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी होती, पण माझा नाईलाज आहे, अशी प्रतिक्रिया दीपकने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply