Breaking News

नरेंद्र मोदींनी मने जिंकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

अमेरिका दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचे दर्शन ह्यूस्टनमध्ये घडले. विमानतळावर मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचे मोदींच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पंतप्रधान मोदींची ऊर्जा क्षेत्रातील सीईओंसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ’हाउडी मोदी’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. तत्पूर्वी, मोदींचे ह्यूस्टन येथे जोरदार स्वागत झाले. एका अमेरिकी अधिकार्‍याने मोदींना पुष्पगुच्छ दिले. त्यातील फांदी जमिनीवर पडली. त्या फांदीला असलेले फुल जमिनीवर पडल्याचे मोदींच्या लक्षात आले. या वेळी त्यांनी स्वतःच ते फुल उचलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोदींच्या साधेपणाचे कौतुक होत आहे. पंतप्रधान असावेत तर असे, अशी भावना एका यूजरने आपल्या पोस्टमधून व्यक्त केली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply