Breaking News

भाजपच्या बैठकांना जोरदार प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका आयोेजित करण्यात आल्या आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 23 सप्टेंबर रोजी च्रिंधण, नेरे व आदईत, तर 24 तारखेला सुकापूर व विचुंबेत भाजपच्या बैठका झाल्या. अशाचप्रकारे 25, 26, 27 व 28 सप्टेंबरला विविध ठिकाणी बैठका होणार आहेत. या बैठकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply