Breaking News

आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

उरण ः वार्ताहर

आज रविवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, यांचे सभासद आंबे मातेच्या आगमनासाठी सजावट करण्यात मग्न झालेले सर्वत्र उरण शहरात, तसेच ग्रामीण भागात दिसत आहेत, मंडप, मखर, रोषणाई करण्यात मग्न असलेले सर्वत्र दिसत आहेत. उरण शहरात गुजराती सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गणपती चौक नवरात्रोत्सव मंडळ, कामठा येथील श्री राधा कृष्ण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव, गुरुकुल अ‍ॅकॅडमी सार्वजनिक नवरात्रोत्सव, भवरा सार्वजनिक नवरात्रोत्सव, कोटगाव  ग्रामस्थ सार्वजनिक नवरात्रोत्सव आदी अनेक ठिकाणी त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कामठा येथील श्री राधा कृष्ण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव, मंडळाचे यंदाचे 14वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, सचिव विजय कडू, खजिनदार नरेंद्र तांडेल, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सहखजिनदार जगदीश पाटील, सहसचिव चंद्रभान ठवरी, सदस्य हेमंत म्हात्रे, हिरासिंग ठाकूर, तानाजी गायकवाड, महादेव साठे, सुरेंद्र कोळी, परशुराम ठाकूर, प्रमोद ठाकूर, रोहित कोटियन, तसेच सल्लागार अमोल कोशे, नागेश जोशी, अदनान परदेशी, सचिन वैद्य, प्रवीण म्हात्रे, वामन पालशेतकर, डॉ. जी. जी. पाटील, उदयसिंग पाटील, दिनेश पवार, डॉ. मनोज भद्रे व उरण शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदींचे सहकार्य मिळणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply