Breaking News

भारत आणि पारशी समाज

भारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात टाटा, गोदरेज, वाडिया, मिस्त्री या पारशी समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे पारशी समाजाने हिंदुस्थानला  स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. विद्युत, कपडा, लोखंड, स्टील, हॉटेल अशा अनेक उद्योगात पारशी समाजाने केलेली उन्नती वाखाणण्याजोगी आहे. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. अर्थशास्त्राचे जनक असणारे दादाभाई भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते होते.

भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 0.007 टक्के असणारा पारशी समाज. देशाच्या प्रगतीत मात्र या समाजाचे योगदान प्रचंड मोठे आहे. कुठलेही क्षेत्र घ्या. या समाजाचा माणूस त्यात सगळ्यात पुढेच दिसणार. राजकारणात दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, भिकाजी कामा, दिनशॉ पेटीट, उद्योगात रतन टाटा, आदी गोदरेज, सायरस मिस्त्री, शापूरजी पालनजी, रूसी मोदी, झोराबियन, पोंचा, सायन्स व टेक्नॉलॉजी होमी भाभा, होमी सेठना, संगीत झुबीन मेहता, फ्रेडी मर्क्युरी, क्रिकेट नरी कॉन्ट्रॅक्टर, फारूख इंजिनीअर, कायदेपंडित नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरिमन, जमशेद कामा, अभिनय सोहराब मोदी, बोमण इराणी, जॉन अब्राहम, लेखन, रोहिंग्टन मिस्त्री, फिर्दोस कांगा, फारूख धोडी, बाप्सी सिधवा, पत्रकारिता रूसी करंजिया, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, बाची करकरीया, केकी दारूवाला, रेसिंग सायरस पुनावाला, नृत्य श्यामक डावर, ज्योतिष जगप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला, सैन्य फिल्ड मार्शल सॅम मानेकशा, जनरल एफ. एऩ. बिलीमोरीया, मेजर जनरल सायरस पिठावाला, जनरल खंबाटा खूप मोठी यादी आहे. समाज थोडा पण कर्तबगारांची संख्या खूप महान आहे.

काय वेगळे केले या लोकांनी की जेणेकरून ते मोठे नाव कमावू शकले. आयत बसून खाल्लं नाही कष्ट केले, मेहनत केली मुख्य म्हणजे देवाने दिलेली बुद्धी वापरली. ना कुठले आरक्षण मागितले, ना नोकर्‍या, ना कधी स्वतःला अल्पसंख्याक म्हणवून घेतले. या समाजातील कर्तृत्ववान माणसांची यशोगाथा वाचायला कमी पडेल इतका पुढे गेलेला हा समाज. आजची सुटी एन्जॉय करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की माणसे केवळ स्वकर्तृत्वानेच मोठी होतात. दुसर्‍यापुढे मागणीचा गळा काढून रडल्याने नव्हे. पारशी समाज भारतातील सर्वात अल्पसंख्याक धार्मिक समूह. भारताच्या अगदी थोड्या भागात पारशी लोकांचे अस्तित्व आहे, तरी एवढी कमी संख्या असून देखील पारशी समाजाचा देशाच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. असं सांगितलं जातं की, पारशी समाज  म्हणून आलेला समाज अफूचा धंदा करीत त्यातून मिळालेला पैसा भारताच्या औद्योगिक क्षेत्रात वळवला या समाजाला या धंद्यांने श्रीमंत बनवलं. रिअल इस्टेट आणि स्टील उद्योगात चांगला जम बसवला. या समाजाला मुंबईसारखी व्यापार नगरी मिळाली, तसेच ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी पारशी समाजाला हवी ती मदत केली. त्यामुळे या समाजाकडे ब्रिटिश काळापासून धनसंपत्ती आहे. 1907 सालापर्यंत आफू विक्रीचा भारताचा व्यापार आजच्या तुलनेत 10 पट जास्त होता. अफूचा मुख्य व्यापार मुख्यत्वे चीनमध्ये केला जात असे. व्यापार पिडाने भरलेला व अंधारलेला असला तरी पारशी समाज त्याचा वापर फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून करीत असे, मात्र दुसरी बाजू पारशी समाजाने याच संपत्तीच्या धनातून हिंदुस्थानात औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. टाटा यांनी स्टीलचा कारखाना सुरू केला तो अफूच्या पैशावरच शक्य झाल्याचे सांगण्यात येते. अनेक शैक्षणिक संस्था जसे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर, सर जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, मेडिकल कॉलेज, जे एन पेटिट लायब्ररी, सेठ जेजे हायस्कूल यांची स्थापना पारशी समाजाने केली. या संस्थांतून दर्जेदार शिक्षण देशात उभे राहिले.

दादाभाई नौरोजी 4 सप्टेंबर 1825  मृत्यू 30 जून 1917 हे पारशी विचारवंत शिक्षण तज्ज्ञ कापूस व्यापारी व भारतीय राजकारणाच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या प्राव्हार्ट्री ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या भारतीय संपत्तीची ब्रिटनकडे वळवण्याच्या कारभारावर लक्ष वेधले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय दिनशा एडलजी वाच्छा, ह्युम यांच्यासह दादाभाई नौरोजी यांना दिले जाते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असणार्‍या दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते.

भारतीय अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया होमी भाभा 1909-1966 यांनी घातला. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे होमी भाभा प्रणेते मानले जातात. प्राथमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. 1940 साली बेंगलोर येथे भारतीय विज्ञान संस्थांचे काम केले. 1945 टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना केली. अणुऊर्जा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा, असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी आणुभट्ट्या तयार करून त्यांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग केला. भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे जनक होमी जहांगीर भाभा यांची ओळख आहे. 1954 साली पद्मभूषण पुरस्कारने गौरविण्यात आले होते. जमशेदजी टाटा हे आगळेवेगळे  व्यक्तिमत्त्व होते. देशात स्टील उद्योग व पोलाद कारखाना खोलण्याची, विद्युत परियोजना हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट व जागतिक दर्जाचे  अध्ययन केंद्र हॉटेल ताज 1903 साली  चार कोटी एक लाख रुपये शाही खर्च करून उभारण्यात आला होता. देशाभिमानी म्हणून जमशेदजी टाटा यांचा उल्लेख केला जातो.  टाटा पावर देशाला लाभलेला महान योगदान आहे. टाटा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे भारतातील प्रमुख उद्योगपती होते. हिंदुस्थान सरकारने भारतरत्न सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता. नुसीरवानजी टाटा हे देशातील पहिले 1868 अलेक्झांडर मील व 1874 मध्ये नागपूर येथे रुई-इंप्रेस मिल कारखाना सुरू केला. देशाच्या जडणघडणीत टाटा घराण्याचा सिंहाचा वाटा आहे. दोराबजी टाटा, रतनजी टाटा नवल टाटा, नोवेल टाटा, अशी अनेक नावे आहेत.

मॅडम भिकाजी कामा प्रथम महिला स्वातंत्र्य सेनानी आहेत ऐषाराम जीवन करण्याचे सोडून भारतमातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल असेंब्लीमध्ये भारतीय ध्वज फडकावला होता. पालनजी शापूरजी मिस्त्री त्यांची दोन मुले शापूरजी मिस्त्री आणि भारतातील मोठे उद्योगसमूह त्यांच्या पालनजी मिस्त्री जगातील सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वात जास्त सफल ताकदवर व्यापारी 82 वर्षीय पालनजी कन्स्ट्रक्शन साम्राज्याचे भारतातच नव्हे, तर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेपर्यंत त्यांचा कारभार सुरू आहे. नानी अर्देशर पालखीवाला यांना भारतीय संविधान आणि देशाच्या कायद्याचा मजबूत पकड असणारे व्यक्ती म्हणून सुपरहीरो, प्रभावी वक्ता, प्रसिद्ध लेखक अशी ओळख पालखीवाला यांची आहे. 1977 ते 1979 या कालावधीत अमेरिकेमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत होते.

जगात दीड लाखांच्या आसपास या समुदायाची लोकसंख्या आहे. पैकी भारतामध्ये 70 टक्के, पाकिस्तानात पाच टक्के, श्रीलंका व अन्य देशांमध्ये 25 टक्के पारशी समाज वास्तव्यास आहे. भारतामध्ये विशेषतः मुंबईत 60 हजार पारशी समाज गुण्यागोविंदाने वास्तव करीत आहे प्राचीन फारस आताचा इराण पूर्व युरोप पासून मध्य आशियापर्यंत या समाजाचे विशाल साम्राज्य होते, मात्र अरब आक्रमण व सिकंदराच्या आक्रमणाने प्राचीन फारस समाजाची सांस्कृतिक साहित्य नष्ट करून टाकली. 1380 मध्ये इराणमध्ये धर्म-परिवर्तनाची लाट सुरू झाली. काहीनी धर्मपरिवर्तन केले, परंतु ज्यांना हे मंजूर नव्हते त्यांनी जन्मभूमी सोडून भारतात हजारो कोसाची समुद्र सफर करीत हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर दाखल झाले. मुंबईच्या जवळ संजान राजा यादव राणा यांनी आश्रय दिला.  इराणच्या पार्स हद्दीतून आल्याने त्यांना पारशी संबोधले जाते, तर फारशीचा अपभ्रंश पारशी असा झाला. या धर्माची विशेषता ही आहे की या धर्मात जन्म घ्यावा लागतो. धर्म बदलून पारसी होता येत नाही. विवाहानंतरही धर्म बदलत नाही वा धर्मात घेतले जात नाहीत. आग्यारीत-मंदिरामध्येही प्रवेश केला जात नाही. हा समाज अग्निपूजा करतो.

इसवी सन पूर्व सातव्या शतकामध्ये या समाजाचा उदय झाल्याचे सांगण्यात येते फारस राजा विश्तास्प यांनी भ्रमंती करून संदेश दिला. त्यांच्यानुसार ईश्वर एकच आहे. जरथुस्त्र महान जीवनदाता म्हणजेच पारशी धर्मात अहुरा मजदा असे संबोधले जाते. ही व्यक्ती नसून सत्व, शक्ती, ऊर्जा आहे.इराणी कालगणनेमध्ये फरवर्दिन पहिल्या महिन्याचा पहिला दिवस आहे. नौरोज म्हणजे नवीन दिवस. मानवाच्या पुनर्जीवन आणि शांती, तसेच शुद्ध वर्तन यावर भर दिला जातो. 20 मार्च 21 मार्च 22 मार्च या कालावधीत हा सण साजरा केला जातो. या दिवशी पारशी समाज एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात. झोरोस्टर, जरथुष्ट्र पारशी धर्माचे संस्थापक मानले जातात. संस्थापकांनी सदाचारावर भर दिला आहे. निराशावाद व अवसानघातकीपणा याला पाप समजले जाते, तर मठवाद, व्रत उपवास यामुळे मानव जात कमजोर होते, वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याची शक्ती कमी होते. वेगवेगळ्या धर्मात अंतिम संस्कार करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. पारशी धर्मात मृत शरीराला गिधाड पक्षाच्या भक्ष्यस्थानी देतात. तर काही वेळा विहिरीत शव टाकले जाते. या समाजात वृद्धांची संख्या

30 टक्के आहे. ज्याला काही शिकायचंय त्याने या समाजाकडून हे जरूर शिकून घ्यावे. 2011 च्या जनगणनेनुसार 60 हजार लोकसंख्या पारशी समाजाची होती. या समुदायात प्रत्येक वर्षी आठशे जणांचे मृत्यू होतात, तर वर्षाला फक्त दोनशेच मुलं जन्म घेतात. केंद्र सरकारने जियो पारशी योजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली. पारशी समाजातील घटती लोकसंख्या लहान मुलांचे जन्मदर यांच्यामध्ये तफावत असल्याने जन्मदर वाढवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक क्षमतेत वाढ होणे यासाठी केंद्र सरकारने 10 कोटी रुपयांचा निधी खर्ची घातला आहे. तीन वर्ष पारशी समाजात 110  मुले जन्मास आल्याची नोंद आहे. जियो पारशी या योजनेमुळे प्रतिवर्षी 240 जन्मदर झाला आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply