Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये मतदार जागृती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शनिवारी (दि. 28) निवडणूक आयोग उरण यांच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.

इयत्ता पाचवी ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविण्यात आले. उरण निवडणूक आयोगाचे समन्वयक संतोष पवार यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मतदान आणि मतदाराचे महत्त्व समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांकडून मतदानाचा संकल्प म्हणवून घेऊन तसे संकल्पपत्र लिहून घेण्यात आले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य मोहन पाटील, पर्यवेक्षिका आशा मांडवकर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे, प्राध्यापक दिनेश सासवडे, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply