Breaking News

रेडलाइट एरियात कोम्बिंग ऑपरेशन; 18 मुलींची सुटका

पुणे ः प्रतिनिधी

बुधवार पेठेतील रेड लाइट एरियात काही घरांत मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून 18 मुलींची सुटका केली़. 

या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी 9 घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. जहाना मोहंमद, रजा शेख, रुपा अब्दुलखान, मैली टिकातमांग, तारा बकतलतमांग, यास्मीन मोबीन शेख, काजल गोरे, तमांग आणि गंगाबाई कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवार पेठेतील रेड लाइट एरियातील काही घरांत मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना शनिवारी मिळाली़. त्यानंतर परिमंडळ एकमधील 15 पोलीस अधिकारी व 70 पोलीस महिला, पुरुष कर्मचारी त्यांनी सायंकाळी बुधवार पेठेतील सर्व परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले़. संपूर्ण परिसर पिंजून काढला़. त्यात या 9 घरमालकांकडे 18 मुली मिळून आल्या़.  या पीडित मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून घरमालक, मालकीण जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे व त्यांच्या कमाईतील 50 टक्के पैसे घरमालक घेत असल्याचे सांगितले़. त्यानंतर या 18 मुलींना न्यायालयात हजर करण्यात आले़. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्यांना हडपसर येथील रेस्क्यू फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले आहे़. फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी वेश्याव्यवसाय करणार्‍या सर्व महिलांची वैयक्तिक माहिती असलेला डाटा तयार केला आहे़. त्यात त्यांच्या फोटोसह आधार कार्ड व अन्य माहिती नमूद केली आहे़. यावरून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय चालत असलेल्या सर्व इमारतींमधील सर्व घरांमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी केली़. त्यात पोलिसांकडे नोंद नसलेल्या 18 मुली सापडल्या, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले़.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply