Breaking News

माथेरानमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली

कर्जत : बातमीदार

येथील सिलिया पॉइंट व किंग जॉर्ज पॉइंटच्या दरम्यान एका महिलेने रविवारी दुपारी आत्महत्या केली होती. त्या वेळी तिची पर्स सापडली. त्या पर्समध्ये घरचा पत्ता असल्यामुळे तिची ओळख पटली आहे. गेली दोन दिवस रेस्क्यू टीम शोधकार्यात व्यस्त होती. दरीचा जंगल भाग तपासल्यानंतर 1000 फूट खोल दरीत तिचा मृतदेह आढळला. नीना रणजित रॉय (30) असे या महिलेचे नाव असून ती नवघर मुलुंड येथे राहत होती. दरीमध्ये मृतदेहाच्या बाजूला असलेल्या पर्समुळे तिची ओळख पटली. पर्समध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाइल व सुसाइड नोट सापडली. या शोधकार्यात माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमचे संदीप कोळी, वैभव नाईक, सुनील कोळी, सुनील ढोले, महेश काळे, अमित कोळी, उमेश मोरे, अजिंक्य सुतार, संतोष केळगणे, धीरज  वालेंद्र, अक्षय परब, धोंडू कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सहाय्यक फौजदार नारायण बार्शी, पोलीस नाईक महेंद्र राठोड पोलीस शिपाई राहुल पाटील, प्रशांत गायकवाड यांनी मेहनत घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सोमवारी रात्री उशिरा कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह  विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या वेळी मृत महिलेचे नातेवाईकही हजर होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply