Breaking News

उरण येथे महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांची प्रदर्शन, विक्री

उरण : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत, प्रेरणा व शिवसंग्राम महिला ग्रामसंघ केगाव आयोजित उरण नगर परिषदेच्या सहकार्याने महिला स्वयंसहायता समूह आणि महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाची जाहिरात आणि विक्री व्हावी हा उद्देश ठेवून दोनदिवसीय प्रदर्शन आणि विक्री मेळावा महिलांच्या उत्कर्षासाठी मेहनत घेणार्‍या जयश्री रमाकांत पाटील, प्रज्ञा सुधीर पारधी आणि जाईली परेश तेरडे यांनी आयोजित केला होता.

शनिवार (दि. 30) आणि रविवार (दि. 31) रोजी उरण नगरपालिका शाळेचे नाना मराठी माध्यमिक शाळेचे मैदान येथे या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होतेे. यामध्ये विविध स्वयंसहायता गट आणि महिला व्यावसायिकांनी उत्साहाने भाग घेत दिवाळी फराळ, दिवाळी सजावट, कंदिल, पणत्या, क्रॉकरी, साड्या, ड्रेसेस, मोत्यांच्या वस्तू, पेंटिंग्ज, चॉकलेट्स, व्हेज नॉनव्हेज पदार्थ वगैरे एकूण 33 स्टॉल्स ठेवले होते.

शनिवारी सकाळी नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते आणि नायब तहसीलदार आशा म्हात्रे, केगाव सरपंच नंदकुमार पाटील, सीमा घरत यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. संध्याकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी पूनम गणेश पाटेकर या शिक्षिका विजेत्या ठरल्या. त्यानंतर स्टेप आर्ट डान्स अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी आयोजकांतर्फे 1000 रुपयाच्या वर खरेदी करणार्‍या ग्रहकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. लकी ड्रॉ विजेत्या वैदेही वैभव कलंगुटकर यांनी पैठणी जिंकली, तसेच 100 रुपयाचे कूपन घेणार्‍यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply