Breaking News

रोह्यात अन्नदान, वृक्ष लागवड

भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष विलास डाके यांचा वाढदिवस निमित्ताने उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी

भाजप कामगार मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष तथा  राजमुद्रा फाउंडेशनचे सल्लागार विलास डाके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) भुवनेश्वर अदिवासीवाडीतील 50 कुटुंबातील सदस्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयालगत वृक्ष लागवड करण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड अध्यक्ष तथा रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदिका डाके, युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस श्रद्धा घाग, सदस्या वैभवी भगत, रितेश घाग, अश्विनी घाग यांच्यासह अदिवासी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply