पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अशोक जानोरकर यांनी, तसेच मोठा खांदा येथील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ‘कमळ’ हाती घेतले. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन भाजपत स्वागत केले.
पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, भीमसेन माळी, शिवाजी दुर्गे, दिलीप खानावकर, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रशेखर जळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी आदी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादीचे नेते अशोक जानोरकर यांच्यासह काँग्रेसचे मोठा खांदा येथील अॅड. संतोष भगत, अविनाश कोंडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.