पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे तेजस्विनी महिला ग्रामसंघ, गु्रप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हळदीकुंकू व माहेरवाशिणींचा आदर सत्कार समारंभ शनिवारी (दि. 4) झाला. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कुंडेवहाळ येथील जग्दगुरू संत तुकाराम महाराज मंदिरात हळदीकुंकू व माहेरवाशिणींचा आदर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, सरपंच सदाशिव वास्कर, वर्षा प्रशांत ठाकूर, रंजना वास्कर, संजय बडे, प्रिती वास्कर, संजिवनी पाटील, ऋषिकेश वास्कर, करिष्मा वास्कर, जागृती वास्कर, संगीता वास्कर, विनोद भोईर, दत्तात्रेय पाटील, वंदना पाटील, भारती भोईर, यशोदा कातकरी यांच्यासह गावातील महिला तसेच माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कुंडेवहाळ गावातील ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या आहेत त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांना गावात बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त माहेरवाशिणींनी जुन्या मैत्रिणींसोबत विचारांची देवाणघेवाण करून आठवणींना उजाळा दिला तसेच या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले. या वेळी मनोरंजनात्मक कायर्कम, वयोवृद्ध व्यक्तींचा सत्कार, चला जिंकूया पैठणी यांसह महिलांसाठी विविध कार्यक्रम रंगले. त्यामुळे महिलावर्गाच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …