Breaking News

हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रवीशेठ पाटील

जलजीवन मिशनच्या आधारे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचे माझे ध्येय

पेण : प्रतिनिधी

हमरापुर  विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले.  आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील आठ गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी पुढे ते म्हणाले कि, मी कोणत्याही मंत्र्यांकडे जाऊन विकास निधी आणू शकतो त्यामुळे पेण तालुक्यात विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मतदार संघाचा विकास हे माझे ध्येय आहे ते मी पूर्ण करणारच मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोरोना काळात असलेले  विकासासंदर्भात असलेले प्रश्न आताच्या पुढील काळात सोडवण्यावर भर दिला जाणार असून प्रश्न तातडीने सोडविण्याचे आम्ही ठरवले.  यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, आजी-माजी सरपंच, जीवन प्राधिकरण उपअभियंता महाजन, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वैकुंठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की अनेक नेते येतात व वल्गना करून जातात पण कामाच्या बाबतीत काहीच करत नाहीत. रवीशेठ पाटील यांनी पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशनच्या अंतर्गत हर घर हर जल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास नेण्यासाठी हमरापुर विभागात अकेक विकासकामांचा शुभारंभ केला. हमरापुर विभागातील गावातील शुद्ध पाण्याचा प्रश्न आमच्याच अधिपत्याखाली सोडवला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply