Breaking News

रायगडातील 2012 शाळा झाल्या डिजिटल

अलिबाग : प्रतिनिधी
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दोन हजार 603 शाळांपैकी दोन हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस आहे.
प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्याने डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करीत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत. शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करीत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी लहान-मोठे उद्योजक, सामाजिक संस्था यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सामाजिक उत्तरदायित्वातून झालेल्या मदतीमुळे गावागावातील शाळा डिजिटल झाल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply