Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस पाठिंबा, विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांचे समर्थन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांनी आपला पाठिंबा दिला असून, पाठिंब्याचे पत्र पदाधिकार्‍यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संघटना खांदा कॉलनी, कुंभार समाज विकास संघ, कुंभार समाज महिला मंडळ, सौरठीया प्रजापती कुंभार सामाजिक संस्था, भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी, पद्मशाली समाज कामोठे, हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक मंडळ, बालाजी व्यापारी सामाजिक संस्था, ब्राह्मण सभा नवीन पनवेल, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा कोकण विभाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले समर्थन दिले आहे. 

या वेळी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भीमराव पोवार, कार्याध्यक्ष संजय कांबळे, कृष्णा पाटील, लक्ष्मण कुंभार, हनुमंत गोळे, मधुकर पगारे, कुंभार समाज विकास संघाचे अध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, कुंभार महिला मंडळाच्या अध्यक्षा नीना जेडवा, उपाध्यक्षा वर्षा जेडवा, वैशाली जेडवा, काश्मिरा देवालिया, वैजयंती जेडवा, सौरठीया प्रजापती कुंभार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय सिंगाडिया, प्रणय टांक, कीर्तिकांत रावत, जयेश जेडवा, भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनीचे लोकशाहीर वामनराव घोरपडे, मुकुंदराव दाभाडे, मीनाक्षी थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय कळंबोली आणि प्रभाग क्रमांक 14 येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये शीख, मुस्लिम आणि राजस्थानी समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला, तर राहुल प्रसारक शिक्षण संस्थेनेही आमदार प्रशांत ठाकूर यांना आपले समर्थन दिले आहे. (सविस्तर बातम्या, छायाचित्रे पान 3 व 6 वर..)

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply