अलिबाग : जिमाका
जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट आणि रोहा तालुक्यातील आंबेवाडी पंचायत समिती गणामधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 4 ऑक्टोबर, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्द करण्याचा दिनांक 2 नोव्हेंबर, मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्याची तारीख 8 नोव्हेंबर, निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीख 8 नोव्हेंबर, मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे दिनांक 11 नोव्हेंबर असा आहे, असे तहसीलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.