Breaking News

‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’

पनवेल ः बातमीदार

नो डेव्हलपमेंट-नो वोट, या मोहिमेविषयी सहकारी सोसायट्या व सामाजिक संघटनांची स्वीप अंतर्गत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपरिवर्तन व्हावे, याकरिता पनवेल महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक यशस्वीपणे पार पडली.

सोसायट्या व संस्थांचे 18 पदाधिकारी शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30 वाजता उपस्थित राहिले होते. नागरिकांनी आपल्या असलेल्या समस्या व त्याबाबत होत असलेले दुर्लक्ष याबाबत सांगितले. समस्या जरी असल्या तरी आता घटनात्मक मतदानाचा अधिकार न वापरणे चुकीचे आहे, तसेच इतरांना मतदानापासून परावृत्त करणे देखील योग्य नाही, याबाबत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने सोडवल्या पाहिजेत, यावर सर्वांना प्रशासनाची भूमिका पटली. सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. आपल्या समस्या त्या त्या सक्षम प्राधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि जसे आता एकत्र आले तसे नंतरही एकत्र येऊन लोकप्रतिनिधींना याबाबत वेळोवेळी आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत. सोसायटी प्रतिनिधींनी आपली भूमिका जोरकसपणे मांडली. एकंदरीत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावे आणि कोणालाही मतदानापासून रोखू नये, यावर एकमत झाले. डू नॉट वोट, असे आम्ही म्हणालो नाही, असे सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर यांनी मांडले. किंबहुना उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा पर्याय आहेच, परंतु मतदानावर बहिष्कार टाकू नये, असे सर्वांनी चर्चेअंती ठरवले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply