कळंबोली : वार्ताहरपनवेल तालुक्यातील वलप गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी आपल्यासह आपले आई-वडील व मुलींचा वाढदिवस आदिवासी मुले व जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा केला आहे. या वेळी ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करतात. सोमवारी (दि. 28) किरण पाटील यांनी आपली कन्या कार्तिकी पाटील हिचा वाढदिवस हेटवणे आदिवासी वाडीतील राजिप शाळेत केक कापून साजरा केला. या वेळी त्यांनी 51 मुलांना दिवाळीचा फराळ व शालेय साहित्याचे वाटप करत त्यांचा आनंद द्विगुणित केला. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करून साजरा करण्यात आला. या वेळी हभप बाळाराम बुवा पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जाधव, वीणा क्लासेसचे भुषण भुवड सर, नामदेव गीरा, मानसी पाटील, उज्ज्वला पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper