Breaking News

वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो सांगून फसवणूक चौघांना पश्चिम बंगालमधून अटक; तिघांचा शोध सुरूच

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालात प्रवेश मिळवून देतो म्हणून सांगून 32 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीतील चार जणांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याकडून 20 लाख रू. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वषण शाखेने ही कामगिरी केली.
सौरभ सौम्य दास (वय 43), सोमेन सुधांशू मून्ना (वय 33), सोमेश बिरेंद्रनाथ बिरा (वय 27) व अभिषेक कुमार दिलीप रज्जाक (वय 22) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे तीन साथीदार फरार आहेत. या चार आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रागड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्घे यांनी ही माहिती बुधवारी (दि. 4) पत्रकार परिषदेत दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या वेळी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील अभिजित अप्पासाहेब वानिरे यांना आरोपी सोमेन सुधांशू मन्ना याने फोन करून तुमच्या मुलीला अलिबाग येथील रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्ययलयात प्रवश मिळवून देतो, असे सांगून त्यासाठी 32 लाख 50 हजार रू. द्यावे लागतील असे सांगितले. वानिरे यांनी 27 सप्टेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील हॉटेल रवीकिरण येथे 32 लाख 50 हजार रू. आरोपींना दिले. हे पैसे घेऊन मोबाईल बंद करून आरोपी फरार झाले. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच वानिरे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तपासासाठी एक पथक तयार केले. आरोपी हैद्राबादमार्गे ओरिसाच्या दिशेेने जात असल्याची माहिती पोलिसांना सायबर पोलिसांनी दिली. आरोपी मोटारीने जात होते. पोलीस पथक विमानाने आधीच पश्चिम बंगालमध्ये पोहचले. पश्चिम बंगालधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील बालाभद्रपूर येथे जाऊन आरोपींची गाडी अडवून त्यातील चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पाच लाखांची स्कॉर्पिओ, फसवणूक केलेल्या रकमेपैकी 20 लाख रू. रोख, गुन्ह्यात वापरलेला पाच हजार रू. किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. इतर तीन आरोपी फरार आहेत. पळून पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के पुढील तपास करीत आहेत.
रागड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार प्रतिक सावंत,पालीस नाईक सचिन वावेकर, पोलीस शिपाई इश्वर लांबोटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्यांना सायबर पोलीस नाईक तुषार घरत, पोलीस नाईक अक्षय पाटील यांचे सहकार्य लाभले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply