Breaking News

वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे पोलिसांना निर्देश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेलच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. विकासाच्या दृष्टीने पनवेल हे मुंबई, ठाणे, पुणे, गोवा वाहतुकीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी होणार्‍या ठिकाणांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडविण्याच्या दृष्टीने निर्देश दिले. मुंबई-पुणे-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शिव शंभो नाका, पंचमुखी मारुती मंदिर परिसर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. या वेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व वाहतूक निरीक्षक अभिजित मोहिते यांच्यासह नगरसेवक अजय बहिरा आणि उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश इनामदार, रवी नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply