Breaking News

वीर वाजेकर कॉलेजची आदिवासींना दिवाळी भेट

उरण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र व डीएलएलई विभागातील विद्यार्थ्यांनी कोप्रोलीच्या डोंगरावरील आदिवासी पाड्यात जाऊन पुरुष, स्त्रिया व मुलांना  आपल्या घरातील बनवलेले दिवाळी पदार्थ व कपडे (साड्या, ड्रेस, मुलांचे पोशाख) भेट दिले.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या वेळी प्रथम कोप्रोलीच्या रस्त्यावरून दिवाळी फटकामुक्तीसाठी घोषणा देत रॅली काढण्यात आली. नंतर आदिवासी भागातील बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाईचे वाटप करण्यात आले. आदिवासी समाजाने याबद्दल समाधान व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी पुढेसुद्धा असेच या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे मत व्यक्त केले. कल्याणी, प्रेम व इतर ग्रुपच्या या विद्यार्थ्यांनी   प्रा. संदीप घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply