Breaking News

कर्नाळा विभागात शेकापला हादरा; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील कर्नाळा विभागात शेकापच्या स्थानिक गाव पुढार्‍यांच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले आहेत. कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कल्हे येथील शेतकरी कामगार पक्षाचे  माजी सरपंच राजाराम जंगम यांचे बंधू जगदीश जंगम, शैलेश सलाके, दत्तात्रेय वायकर,  माजी सरपंच यांचा मुलगा रवींद्र वाघमारे, माजी सदस्य राम सवार, बबन पवार, राजू सवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 कल्हे गावात हा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी शिवसेना पक्षाच्या विचारांवर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या कार्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, विभाग प्रमुख डॉ. भरत घरत, शाखाप्रमुख छोटू जुमलेदार आदींच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मनोहर भोईर यांनी प्रवेशकर्त्यांच्या हाती भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले. या वेळी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, विभाग प्रमुख डॉ. भरत घरत, शाखाप्रमुख छोटू जुमलेदार, उपशाखा प्रमुख संदेश विश्वासराव, तारा शाखा प्रमुख राजेंद्र म्हात्रे, बारापाडा लक्ष्मण पाटील, संदीप सावंत, केतन जंगम, सुनील पवार आदी मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply