मुंबई : राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी (दि. 9) एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांत शहरात कोरोनामुळे नऊ जण दगावले आहेत, तर विविध रुग्णालयांत दाखल असलेले सहा कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 1346 झाला आहे. यातील 857 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. दुसरीकडे देशात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734वर पोहचली आहे. उल्लेखनीय म्हणजे यातील 549 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 166वर पोहचली आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …