नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीने भारतातील पहिल्या डे-नाइट कसोटीचा मार्ग मोकळा करून दिला. 22 नोव्हेंबरला भारताचा पहिला डे-नाइट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ पंचाचा तब्बल पाच वेळा मान मिळवणारे सायमन टफेल यांच्या ’फाइंडिंग द गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गांगुली उपस्थित होता.
’मी प्रचंड धैर्याने काम करणारा व्यक्ती आहे. ही गोष्ट मी माझ्या क्रिकेट करिअरमध्ये शिकलो आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्याचे कसब अवगत झाले आहे. यातूनच स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवाव्यात हे मी शिकलोय. माझे आयुष्य इतरांच्या अपेक्षांवर अवलंबून नाही,’ असे स्पष्ट मत गांगुलीने या वेळी व्यक्त केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत डे-नाइट कसोटीबाबत चर्चा झाल्याचाही उल्लेख या वेळी गांगुलीने केला. कोहलीने अवघ्या तिसर्या सेकंदात डे-नाइट कसोटीसाठी होकार दिला, असे गांगुलीने सांगितले.