Breaking News

मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्पर्धा जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी

 पावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलली. ती 11 नोव्हेंबरपासून पुन्हा

सुरू होईल.

मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पावसाच्या अनिश्चितीमुळे पुढे ढकलण्यात आली. दसर्‍यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा दिवाळीपूर्वी पावसामुळेच रद्द करावी लागली होती. 4 नोव्हेंबरला ही स्पर्धा सुरू होणार होती, पण वेधशाळेने केलेल्या भाकितानुसार मुंबई शहर कार्यकारिणी मंडळाला हा निर्णय घ्यावा लागला.

आता ही स्पर्धा 11 नोव्हेंबरपासून खेळविण्यात येईल. याकरिता

स्पर्धेची नवीन कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली असून, लवकरच ती सर्व सहभागी संघांना मिळेल याची काळजी घेण्यात येईल. आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्या सामन्यासंबंधी विचारणा करावयाची असेल तर रविवार व सुटीचे दिवस वगळून संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply