Breaking News

निवड समिती प्रमुखपदी वेंगसरकर?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्षे दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारे बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची

शक्यता आहे. 

याआधी 2006 ते 2008 दरम्यान वेंगसरकर निवड समितीचे प्रमुख होते. वेंगसरकरांच्या कार्यकाळातच विराट कोहलीला भारतीय संघात स्थान मिळाले होते. एम. एस. के. प्रसाद सध्या निवड समितीचे प्रमुख आहेत, मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार आणि सध्याच्या समितीमधील माजी खेळाडूंचा अनुभव पाहता प्रसाद यांच्या सहकार्‍यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या निवड समितीमधील काही सदस्यांना डच्च्ाू दिला जाऊ शकतो.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply