Breaking News

संपकरी डॉक्टरांचा संप अखेर मागे

अलिबाग : प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांचे मानधन शासनाकडून वेळेत न दिल्याने डॉक्टरांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व संप पुकारलेले डॉक्टर उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी संपकरी डॉक्टरांचे मानधन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला असून, तत्काळ कामावर हजर होण्याचे निर्देश मान्य केले आहेत.

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply