Breaking News

अंकित पाटील सुवर्णपदकाचा मानकरी

श्रीगाव : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील अंकित नवनाथ पाटील कर्जत येथे

झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 66 ते 70 किलो वजनी गटामध्ये एकूण 23 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधून सन मार्शल आर्ट्स अ‍ॅकॅडमी मेढेखारचा कराटेपटू अंकित पाटीलने सुवर्णपदक पटकावून मेढेखार गावासह रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. या यशाचे श्रेय आईवडिलांचे आहे, असे अंकितने सांगितले. या यशाबद्दल अंकितचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply