Breaking News

उरण-कोप्रोली येथे भर दिवसा घरफोडी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, 16 एप्रिल रोजी कोप्रोली नाक्यावरील एकाच वेळी चार दुकांनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा या घटनेला अवघे 45 दिवस झाले असताना काल सकाळी भर दिवसा चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उचकटून 21 इंच एलएडी टीव्ही आणि 600 रुपयांची रोकड घेऊन पाठीमागच्या दरवाजातून पलायन केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार उरण तालुक्यातील कोप्रोली येथील चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील, बापूजी देवस्थान रोडलगत असलेल्या फिर्यादी निवृत्ती कृष्णा म्हात्रे (35) हे पावसाळ्यासाठी घराच्या उत्तरेकडील आग्रामध्ये मीठ आणण्यासाठी गेले असता, घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या दरवाजाची कडी कटावणीद्वारे उचकटून घरात प्रवेश केला. घरातील वस्तू उलथापालथ करून घराच्या हॉलमधील एलजी कंपनीचा 21 इंच एलएडी टीव्ही आणि 600 रुपयांची रोकड घेऊन घराच्या पश्चिमेकडील पाठीमागच्या दरवाजातून बाहेर पडून अज्ञात चोरटे पसार झाले.

घरमालक निवृत्ती म्हात्रे हे आग्रातून मीठ घेऊन आले असता घराच्या प्रवेशद्वाराच्या दरवाजाची कडी खालच्या बाजूने उचकटलेली दिसल्याने त्यांनी तत्काळ घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील वस्तूंची उलथापालथ करून टीव्ही व रोख रकमेची चोरी झाल्याचे समजताच पत्नीसह उरण पोलीस ठाणे गाठले व घरफोडी करणार्‍या अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मागील तीन दिवसांपूर्वी दहशतवाद विषयक मजकूर लिखाण करणार्‍या इसमास जेरबंद करताच एक दिवसानंतर त्वरित घरफोडी झाल्याने या विभागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले असून, मागील कोप्रोली नाक्यावरील चार दुकानाचे शटर तोडून धाडसी दरोडा टाकणार्‍यांचा उलगडा होण्याआधीच पुन्हा चोरट्यांनी भरदिवसा घरफोडीचे धाडस केल्याने पुन्हा एकदा उरण पोलिसांच्या तीन दिवसांच्या जगत्या पाहर्‍यातील तपासाच्या यशानंतर आणखी मोठे आव्हान या घरफोडीतील चोरट्यांनी उभे केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply