Breaking News

टी-20 वर्ल्डकप आयोजनाबाबत साशंकता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयने तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2021 स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धा नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा भारतातच खेळवण्यात यावी यासाठी बीसीसीआयने 29 तारखेला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी यूएई हा दुसरा पर्याय बीसीसीआयसमोर आहे आणि आयसीसीही त्यासाठी सकारात्मक आहे, पण बीसीसीआयचे टेन्शन वाढविणारे विधान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मायकेल हसी याने केले आहे.

भारतात या वर्षी टी-20 वर्ल्डकप होणे अवघड आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज हसीने व्यक्त केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक असलेला हसी नुकताच मायदेशात परतला. त्यालाही कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातून तो बरा झाला आहे. तो सध्या सिडनीत क्वारंटाइन कालावधी पूर्ण करीत आहे. त्याने टी-20 वर्ल्डकपसाठी यूएई हाच योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले.

माझ्या मते भारतात टी-20 वर्ल्डकपचे आयोजन होणे अवघड आहे. आम्ही आठ संघांसह येथे आयपीएल खेळलो, पण टी-20 स्पर्धेसाठी संघसंख्या अधिक असणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सामने खेळवावे लागतील. मी आधीही सांगितले आहे की जर आपण वेगवेगळ्या शहरांत खेळणार असू, तर धोकाही तितकाच वाढेल, असे हसीने सांगितले. तो पुढे म्हणाला, माझ्या मते तेही हाच विचार करीत असतील व यूएई किंवा अन्य कोणत्या तरी देशाचा वर्ल्डकप आयोजनासाठीचा पर्याय खुला ठेवला असेल. जगभरातील क्रिकेट मंडळे सद्यस्थितीत भारतात येण्यासाठी घाबरत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply