मुंबई ः प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्यांनी मुंबई विद्यापीठाच्या रुईया महाविद्यालयात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. विल्फ्रेड गोन्सालविस याने 60 किलो वजनी गटात, तर स्नेहा खरटमलने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. ज्योती धडसेने 54 किलो, सुनील मोरेने 56 किलो, साईराज हेगिस्तेने 75 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले.
अमित दुबे व अथांग अंदेवार यांना अनुक्रमे 81 किलो व 69 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले. यापैकी विल्फ्रेड गोन्सालविस आणि स्नेहा खरटमल यांची डिसेंबर 2019मध्ये उत्तर प्रदेश येथील बागपत येथे होणार्या आंतरविद्यापीठ मुष्टियुद्ध
स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना सुप्रसिद्ध प्रशिक्षक राजन जोथाडी यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्वांच्या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-धनुर्धारींचे सुयश
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींनी मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून, अनेक पदके मिळवली आहेत. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत विविध गटांमध्ये लीना नाईक हिने सुवर्ण, वोमेश वारुंजीकर व अलोक गुरव यांनी रौप्य, तर प्रणव निमकर याने कांस्यपदक प्राप्त केले. सुप्रसिद्ध प्रशिक्षक स्वप्नील परब यांच्या मार्गदर्शनाखाली या धनुर्धारींनी ही नेत्रदीपक कामगिरी केली.