Breaking News

तळोजा येथे ओला चालकास लुटले

पनवेल : रामप्रहर वृत्त

एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) असे या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेवून रियाज शेख तळोजा येथे जात असताना कळंबोली लिंक रोड पेट्रोल पंपाजवळ कारमधील चौघांनी लघुशंकेचे निमित्त करून कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी गाडी थांबविली. यावेळी चौघांनी मिळून ओलाची जीपीएस यंत्रणा काढून टाकली. तसेच रियाज यांच्याकडील मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. या झटापटीत रियाज यांनी स्वतःची कशीबशी सुटका केली व ते गाडी घेवून तेथून निघाले. याबाबतची माहिती ओलाच्या व्यवस्थापनाला दिल्यावर त्यांनी त्याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना चार आरोपींपैकी दोघेजण तेथेच फिरत असल्याने पोलिसांनी त्या दोघांंना ताब्यात घेतले. त्यांची ओळख पटताच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युसूफ शेख याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा अजून एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply