Breaking News

एसटी बसचालक व वाहकाचा प्रामाणिकपणा

हरवलेली दीड तोळ्याची सोनसाखळी मूळ मालकाला परत

अलिबाग : प्रतिनिधी

एसटी बसमध्ये प्रवाशाची हरवलेली दीड तोळ्यांची सोनसाखळी  अलिबाग डेपोचे चालक रा. सू. कवळे आणि वाहक अ. को. टोपलवार यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला सुपूर्द केली. या प्रमाणिकपणाबद्दल चालक आणि वाहक यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. अजोगो अब्दुला पठाण असे प्रवाशांचे नाव असून त्यांनीही चालक व वाहक यांचे आभार मानले आहेत. अलिबाग डेपोतून चालक रा. सू. कवळे आणि वाहक अ. को. टोपलवार हे सकाळी प्रवाशांना एसटी बसमध्ये घेऊन पनवेलकडे जाण्यास निघाले होते. रामराज येथील अजोगो अब्दुला पठाण हेसुद्धा या बसमध्ये बसले होते. मात्र सदर बस पनवेलला जात असल्याचे समजल्यावर ते बसमधून उतरून रोह्याकडे जाणार्‍या बसमध्ये बसले. या गडबडीत त्याच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोनसाखळी हरवली. रोहा बसमध्ये चैन पडली की पनवेल या बाबत त्यांना कळले नाही. पठाण यांनी याबाबत अलिबाग आगारात संपर्क करून सोनसाखळी  हरवल्याची माहिती दिली. पठाण यांची ती सोनसाखळी अलिबाग-पनवेल बसमध्ये पडलेली वाहक यांना मिळाली. त्यांनी पठाण यांच्याशी संपर्क करून ओळख पटवून ती चैन त्यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी अलिबाग आगार प्रमुख अ. व्ही. वनारसे उपस्थित होते. चालक व वाहक यांच्या प्रामाणिक पणामुळे आगर व्यवस्थापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply