माणगाव : प्रतिनिधी
आम्ही सह्याद्रीचे शिलेदार या संस्थेच्या वतीने माणगाव तालुक्यातीली देगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 22) शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. संस्थे तर्फे उद्योजक गणेश हरिश्चंद्र काजरोळकर व सामाजिक कार्यकर्ते विनोद धोंडू वाढवळ यांनी शाळेतील 15 आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तरे व चप्पल भेट दिल्या. देगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गायकवाड, मुख्याध्यापक महेश विचारे,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शंकर शिंदे, विषय शिक्षक अजित लाड, सहशिक्षिका सोनिया खामकर, स्वयंपाकी समिक्षा दिवेकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक आणि आदिवासी विद्यार्थ्यांच पालक या वेळी उपस्थित होते.