Monday , February 6 2023

अवैध दारू विक्री विरोधात कारवाईची गरज

उरण ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील खोपडी दारुकांड स्पिरिटकांड याचा इतिहास असताना या दोन्ही दारुकांडात जवळपास 100 हुन अधिक जणांचा बळी गेला होता. आजही रायगड जिल्ह्यासह उरणमधील अनेक गावांत गावठी दारू व देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असून दारुबंदी खाते व पोलीस खाते यांचे आर्थिक हितसबंध असल्याची माहिती मिळत आहे.  

उरण तालुक्यातील अनेक गावांत गावठी व देशी-विदेशी दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती पुढे येत आहे.  तालुक्यातील छोट्या-मोठ्या ढाब्यांवर गावठी व देशी-विदेशी दारूची विक्री खलेआम सुरू आहे. याबाबत अनेकवेळा काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येऊनही ते पुन्हा पुन्हा हा अवैध धंदा करीत.

तसेच यांचे वृत्त अनेक वर्तमानपत्रात येऊनही ते सुरू आहेत. काहींनी तर याबाबत लेखी पत्रव्यवहार करूनही त्या अर्जाना केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे दारू विक्री हा आता छोटा व्यवसाय बनत चालला आहे.

या प्रकरणाकडे दारूबंदी खात्याचे कार्यालय असूनही अवैध दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. उरण तालुक्यातीळ ढाब्यांवर व इतर ठिकाणी वाईनशॉप मधून दारू आणून त्याची खुलेआम दिवसरात्र विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करून ही अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply