मोहोपाडा ः प्रतिनिधी
रायगड औद्योगिक पेन्शनर संघटना आणि वाशीतर्फे ईपिएस -1995 पेन्शनर्स करीता जीवनप्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी रसायनीतील रिस कांबा येथे प्रकाश इंजिनिअरिंग यांच्या सभामंडपात जीवनप्रमाण ऑनलाईन मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले आहे.
यावेळी पेन्शनर्सने सोबत पिपिओ नंबर, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक यांची माहिती आणावे असे आवाहन रायगड औद्योगिक पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बामणे यांनी केले आहे.
दरम्यान प्रत्येक पेन्शनरला ह्यात असल्याचा पुरावा म्हणून जीवनप्रमाण सिस्टम जीवन प्रमाणपत्राच्या माध्यमातून डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रस्तूत करणे अनिवार्य असते. दरवर्षी जीवंत असल्याचा पुरावा दाखवताना काही ठिकाणी स्वता:चे पैसे टाकून पेन्शनर्सला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकरिता वाशी कार्यालयाकडून ईपिएस 1995 पेन्शनर्सकरीता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शिवाजी
बामणे यांनी सांगितले.