Breaking News

उन्हाळा झाला असह्य

मेंढ्यांनीही घेतला सावलीचा आधार

रसायनी : प्रतिनिधी : एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा असह्य होत असल्यामुळे, पशू-पक्ष्यांपासून सर्वच जण हैराण झाले आहेत. मे महिन्यात सूर्याने उग्ररूप धारण केल्याने वातावरण असह्य होऊन जात आहे. यामुळे थंडावा मिळण्यासाठी मेंढ्यांनी वृक्षांच्या सावलीचा अधार घेत आसल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

कोकणात घाटमाथ्यावरील मेंढपाल मोठ्या संख्येने येत असल्यामुळे उन्हाच्या झळा त्यांना सोसाव्या लागत आहते. या उन्हापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने मेंढ्या आंबा, वड, जांभुळ, पिंपळ आदी वृक्षांच्या सावलीचा आधार घेत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी धनगर समाज मोठ्या प्रमाणात येत असून आठ महिने खडतर प्रवास करून घराबाहेर राहावे लागत असते.

यामुळे मिळेल तिथे चारा व पाण्याची व्यवस्था पाहून मेंढपाळ आपला मुक्काम त्या ठिकाणी स्थिरावत असतात, मात्र रणरणत्या उन्हामुळे  मेंढ्या चारण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे  उन्हापासून मेंढ्यांचे संरक्षण व्हावे या विचाराने मेंढ्या दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये एखाद्या वृक्षाच्या सावलीचा अधार घेताना दिसत आहेत.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply