Monday , February 6 2023

हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा बंदोबस्त

पनवेल : बातमीदार

नागपूर येथे सोमवारी (दि.16) पासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या बंदोबस्ताची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. बाहेर जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील 24 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नागपूर येथे पोहोचले असून शनिवारपासून तैनात झाले आहेत.

 हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपूर येथे असणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या आतमध्ये व बाहेर कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त यांनी दहा दिवस आधी पोलीस बंदोबस्त कशाप्रकारे व किती असावा कोण कुठे असेल, कोणती जवाबदारी पार पडेल ते ठरवून देण्यात आले आहे. याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार राज्यभरातून बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची बोलावणी करण्यात आलेली आहे.

त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक,15 कर्मचारी असे एकूण 25 पोलीस नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होत नागपूर येथे तैनात झाले आहेत.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply